जीवनात ठरवलेले ध्येय साध्य करण्यासाठी कौशल्य आणि संयम असावा लागतो. या दोहोंचा संगम करून त्याला अपार मेहनतीची साथ देत उद्योग क्षेत्रात एक यशस्वी मराठी व्यावसायिक म्हणून ज्यांनी आपल्या कक्षा रुंदावल्या असे प्रोत्साहनात्मक व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे येथील डॉ. ओमकार हरी माळी होय.
लंडन येथील (IHMES International Business School) ‘एमबीए’ केल्यानंतर त्यांनी ‘इंटरनॅशनल बिझनेस’ या विषयातून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
ते म्हणजे “आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित करणं.” इम्पोर्ट एक्स्पोर्ट उद्योगात आपला किर्तीदायक जम बसवलेले डॉ. ॐकार हरी माळी हे मेडिकल कोलॅबोरेटर म्हणून आज जगातील दुबई, बांगलादेश, उझबेकिस्तान, कझाकिस्तान आणि युक्रेन यासारख्या इतर एकूण सात देशांमध्ये उद्योग करत आहेत. तर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ते ‘ई-कॉमर्स’ क्षेत्रात कार्यरत आहेत.
मराठी तरुण तरुणींना उद्योगासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि व्यवसाय यांचे मार्गदर्शन करून महाराष्ट्राच्या सर्वांगीण वाढीसाठी करण्याचे ठरवले आणि याच उद्देशाने डॉ. ॐकार हरी माळी यांनी १ मे २०२० रोजी ‘उद्यमी महाराष्ट्र’ या उपक्रमाची निर्मिती केली.
डॉ. ओमकार हरी माळी हे ‘मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही’ या प्रचलित वाक्याला खोटे ठरवून ‘उद्यमी महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत सध्या अनेक यशस्वी मराठी उद्योजक घडवत आहेत.
पुढच्या वर्षभरात 10,00000 उद्यमींना प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय डॉ. ओमकार हरी माळी यांनी उराशी बाळगलेले आहे
So My Friend Let's Meet Live!